banner ads

गोदावरीत मांसाचा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

kopargaonsamachar
0

 गोदावरीत मांसाचा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टचे नगरपरिषदेला निवेदन
कोपरगाव समाचार -: कोपरगाव शहरातील काही मांस विक्रेत्यांकडून विक्रीनंतर उरणारा कचरा आणि घाण गटारी तसेच थेट गोदावरी नदीपात्रात टाकली जात असल्याचा गंभीर आरोप करत, संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे. या प्रकारामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यासह गोदावरी नदीच्या पावित्र्यालाही धोका निर्माण होत असल्याचा इशारा ट्रस्टने दिला आहे.



ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील काही मांस विक्रेते नियमांचे उल्लंघन करत उरणारा कचरा गटारीत किंवा थेट गोदावरी नदीपात्रात टाकत आहेत. परिणामी सांडपाण्यासोबत हा कचरा नदीत मिसळून प्रदूषण वाढत असून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.



गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने यापूर्वीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अद्याप प्रभावी कारवाई न झाल्याने ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.ट्रस्टने नगरपरिषदेला मांस विक्रेत्यांना कचऱ्याची वैज्ञानिक व नियमानुसार विल्हेवाट लावण्याचे सक्त निर्देश देण्याची, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दुकाने अधिनियम व संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.


गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम अपेक्षा गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!