कोपरगावच्या दोन नेतृत्वांना राज्यस्तरावर मानाचे स्थान
राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी, तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील समस्त व्यापारी व किराणा दुकानदारांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अजित लोहाडे, खजिनदार तुलसीदास खुबानी, सचिव प्रदीप साखरे, महावीर सोनी, गुलशन होडे, किरण शिरोडे, आनंद लोढा, युवराज गांगवे, आशुतोष पटवर्धन, सुमित भट्टड, उल्हास गवारे, श्याम जंगम, पप्पूशेठ मुंदडा, प्रीतम बंब, यश विसपुते, नारायण लांडगे, धीरज कराचीवाला, हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, हर्षल जोशी यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, किराणा व्यावसायिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी काका कोयटे आणि सुधीर डागा यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी काका कोयटे यांच्या सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा आणि सुधीर डागा यांच्या व्यापारी संघटनांमधील कार्याचा गौरव केला. त्यांच्या निवडीमुळे कोपरगावच्या व्यापारी व सहकार क्षेत्राला राज्यस्तरावर अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा गाव तिथे उद्योजक हा उपक्रम आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचा मेक इन कोपरगाव हा उपक्रम कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने लवकरच हाती घेणार आहोत
ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,
अध्यक्ष,
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ







