ajinky

banner ads

खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक ठाम

kopargaonsamachar
0

 खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक ठाम

 विरोधकांनी धमक्या देण्याऐवजी विकासासाठी पुढे यावे – नितीन औताडे
कोपरगाव समाचार :शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सहा खासदारांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद अधिक वाढली असून, शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी व्यक्त केला.





कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त आयोजित जल्लोष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उबाठा शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत, "खा. वाकचौरे यांना मतदारसंघात फिरू देणार नाही" अशा इशाऱ्यांना ठाम प्रत्युत्तर दिले.




औताडे म्हणाले की, खासदार वाकचौरे यांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा प्रत्येक शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. धमक्या देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम करावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत खासदार वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांनी बोलताना, "खा. वाकचौरे खऱ्या शिवसेनेत आल्याने मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळेल," असा विश्वास व्यक्त केला. तर अक्षय जाधव आणि वैभव चव्हाण यांनी खासदारांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना "शिवसेना स्टाईलने जसास तसे उत्तर दिले जाईल," असा इशारा दिला.

या कार्यक्रमास राजेंद्र झावरे, किरण गवळी, अक्षय जाधव, सनी गायकवाड, संदीप डुमरे, वैभव चव्हाण, इरफान शेख, बाळासाहेब साळुंखे, विकास शर्मा, शेखर कोलते, योगेश उशीर, अमोल लोखंडे, देवा लोखंडे, मनिल नरोडे, प्रसाद सारंगधर, निलेश पवार, गौरव गांगुले, आकाश मेहेर, श्री कुंकूशेठ, वर्षा शिंगाडे, किशोर चोरगे, सिद्धेश खरात, अनंत आढाव, सनी काळे, ऋषी बारहाते आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!