banner ads

तुम्ही चार हजार कोटींचा हिशोब द्या आम्ही चार महिन्याचा देण्यास तयार : नगराध्यक्ष पराग संधान

kopargaonsamachar
0

 

तुम्ही चार हजार कोटींचा हिशोब द्या आम्ही चार महिन्याचा देण्यास तयार : नगराध्यक्ष पराग संधान

नगराध्यक्षांनी मांडला शंभर दिवसांचा लेखा-जोखा
कोपरगाव समाचार:--कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्तांतर नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपल्या चार महिन्यात झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा शहरासमोर मांडला आहे. मा.आ.स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांचा पाठपुरावा सुरू असून जनतेला दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्धपणे काम करतो आहोत अशी भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी यावेळी मांडली.




स्वच्छतेचे काम पूर्वी सुरळीत नव्हते.आता आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी स्वतः प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबवत प्रभावी काम सुरू केले आहे.नवीन टेंडरमध्ये मनुष्यबळ वाढवले आहे,घंटागाडी संख्या वाढवल्या आहे.नालेसफाई सुरू झाली असून शहरातील विविध भागातील नाले स्वच्छ करून पावसाळ्यात होणारी समस्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.शहरात चारच महिन्यात 726 ढापे टाकले. स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स टाकले आहे व अनेक ठिकाणी टाकण्याचे काम सुरू आहे.



प्रशासन काळात नगरपालिका फवारणी फक्त तीन चार वेळा होत होती.आम्ही सत्तेत आल्यानंतर जुना ठेकेदार फवारणी करण्यास येत नव्हता त्याला कुणाचा आशीर्वाद होता हे संशोधन करावे लागेल.आम्ही पालिकेच्या माध्यमातून नव्याने झालेल्या टेंडरमध्ये सुधारणा करून वर्षातून सात ते आठ वेळा फवारणी करण्याचा मानस आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी व वीजबिल थकबाकी याबद्दल सविस्तर लेखाजोखा मांडला.पाणीपट्टी थकबाकीमुळे पाणी बंद का करू नये अशा नोटीस आल्या.पाणी पट्टी थकल्यामुळे पाणी करार करण्यास अडचणी आल्या.दंड आणि व्याज यात पालिकेचे नुकसान पूर्वीच्या कारभारामुळे सोसावे लागत आहे. जनतेला 7 कोटीहून अधिक रकमेचा दंड सोसावा लागला आहे यावर विस्तृत मांडणी केली.


पाच नंबर तलावाची हायड्रॉलिक टेस्ट करण्यात आलेली नव्हती त्यापूर्वीच उद्घाटनाचा गाजावाजा झाला.आम्ही ती टेस्ट करून घेतली तिचा अद्याप अहवाल येणे बाकी आहे. त्याचेही थर्ड पार्टी ऑडिट करून घेणार आहे आम्ही.पाइपलाइन टाकलेल्या होत्या त्या जोडलेल्या नव्हत्या.नवीन पाण्याच्या टाक्या आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण पूर्वीचे प्रलंबित कामामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
फिल्टरेशन प्लांटचे काम काही प्रमाणात केल्याने थोडे चांगले पाणी नागरिकांना मिळाले.पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे चांगले काम करत आहेत.यापुढे पूर्ण काम काही काळात सुरू करणार आहोत आचार संहिता नंतर त्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न आहे.पाइपलाइन गाळमुक्त करून स्वच्छ करणार आहोत.अद्ययावत स्वच्छता गृह आपण लवकरच शहरात बसवतो आहोत त्यात पाणी आणि स्वच्छता याला प्राधान्य असावे हा उद्देश आहे. पूर्वीचे जुने स्वच्छतागृह खराब होते त्यामुळे 75 टॉयलेट आपल्याला मंजूर झाले आहे उर्वरित अजून 75 देखील मंजूर होणार आहे. रुग्णवाहिकेचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे ती लोकसेवेत सुरू आहे.विश्वासनामा जाहीर करत आम्ही भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा शब्द दिला आहे.सध्या होणाऱ्या भूमिगत गटारीचे कामे नागरिकांना कळावे म्हणून फलक लावत पारदर्शक काम ठेवले आहे.क्रेडाई सारख्या संघटनेने यात मार्गदर्शन केले व सुधारित प्रस्ताव केला. एस टी पी प्लांट मानवी वस्तीजवळ होणार होता व जागा देखील अपुरी होती त्यात आपण दोन एकर जागेची तरतूद केली.इन्स्लीरेशन प्लांट आपण सुरू करतो आहोत. स्मशानभूमी अद्ययावत विद्युतदाहिनी प्रस्ताव करतो आहोत.शहरात बंद पडलेली कामे आपण सुरू केली.अडचणी येतील तिथे मार्ग काढला आहे.
फ्रुट मार्केट बंद आहे येथील भाडे कमी करून ती जागा वापरात येऊन वाहतूक अडथळा कमी होणार आहे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.स्मशानभूमीत महिलांना बैठक व्यवस्था आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूमची व्यवस्था करतो आहोत.

आधार कार्ड सेंटर सुरू केले.चौक सुशोभिकरण केले.शहरात ३० जागा निश्चित करून तेथेच फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी असेल त्यासाठी नियमावली असेल ती न पाळल्यास गुन्हे दाखल करणार आहोत.शिवरात्रीचे टेंडर पूर्वीपेक्षा अधिकच्या रकमेत गेल्याने पालिकेचा फायदा झाला.पाण्याच्या तळ्यातील माशाचे टेंडर यात पारदर्शकता आणली. धरणात पाणी साठा कमी असल्याने शहराला पाण्याचे दिवस कमी अधिक झाल्यास थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो मात्र आगामी काळात आम्ही जे धोरण घेऊन काम करतो आहोत त्यानुसार आजच्या पेक्षा पाण्याची दिवस कमी करण्यावर आमचा भर असणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीला रिटेनिंग वॉलची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाकडे केलेली आहे लवकरच त्याबद्दलही सकारात्मक निर्णय होईल. कोपरगाव शहरातील विविध उपनगरातील शासकीय जागांवरील अतिक्रमणांचा विषय देखील मार्गी लागून अनेक नागरिकांना घरांचे हक्काचे उतारे मिळण्याचा मार्ग शासनाकडून मोकळा होतो आहे त्याबद्दल आभारी मानले.आम्ही सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी चारच महिन्यात आम्हाला हिशोब विचारायला सुरवात केली मात्र त्यांनी स्वतःचा चार हजार कोटींचा जो खोटा डांगोरा पेटला त्याचा हिशोब देण्याची तयारी दाखवावी जर त्यांची तयारी असेल तर जनतेच्या समोर सोक्षमोक्ष करण्यास तयार आहोत. आमच्या कारभारात गैर आढळल्यास आम्ही राजीनामा देऊ तुमच्या कारभारात आढळल्यास तुम्ही राजीनामा देणार का असे खुले आव्हानच नगराध्यक्ष पराग संधान यांनी विरोधकांना दिले आहे.बबलूशेठ वाणी,अतुलशेठ काले,विनोद राक्षे,संदीप देवकर, अनिल आव्हाड, रवींद्र कथले,कैलास मंजुळ,सुरेखा राक्षे,विजया देवकर, निलोफर पठाण,स्वप्निल मंजुळ, संजय उदावंत, कलविंदर दडियाल,प्रतीक पगारे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!