banner ads

फुटबॉलच्या मैदानावर संजीवनीचा झंझावात

kopargaonsamachar
0

 

फुटबॉलच्या मैदानावर संजीवनीचा झंझावात


चार राज्यातून प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत उपविजेते पद
कोपरगाव समाचार -: संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कठोर परिश्रम, शिस्तबद्ध खेळ, जिद्द आणि उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र , गोवा व कर्नाटक या राज्यांतील  बलाढ्य संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अशा प्रकारे संजीवनी अकॅडमीने क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम ठेवली आहे.




     स्पर्धेच्या साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली.  उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० असा दणदणीत पराभव करून संजीवनीने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य सामन्यात केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध अत्यंत चुरशीचा सामना रंगला. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. या थरारक संघर्षात संजीवनी अकॅडमीने ४-३  असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलशी संजीवनीचा मुकाबला झाला. संपूर्ण सामन्यात खेळाडूंनी जिद्दीने संघर्ष केला आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडल्या.

आर्यन गौतम सोनवणे, ईशान इम्रान सय्यद (गोलरक्षक), विहान रोहित वाघ (कर्णधार), सात्विक सुभाष औताडे, नैतिक सरोज, गगनराजे सतीश जाधव, निर्भय रुपेश पारख, आरुष संदीप शिंदे, प्रत्यूष दीपक जाधव, विश्वजित राजेंद्र मांजरे, श्रेयस लक्ष्मण भड आणि शौर्य वैभव घुले या   खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली


     या यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष .नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी   अमित कोल्हे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली  कोल्हे, डिरेक्टर ऑफ ऑडिट सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या सौ. अनुश्रीता सिंह यांनी खेळाडू,  क्रीडा विभाग प्रमुख विरुपक्ष रेड्डी, फुटबॉल प्रशिक्षक . मोती कुमार यांचे  अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!