banner ads

महावितरण कोपरगाव ग्रामीण उपविभागाची विक्रमी वीजबिल वसुली

kopargaonsamachar
0

 

महावितरण कोपरगाव ग्रामीण उपविभागाची विक्रमी वीजबिल वसुली

कोपरगाव समाचार -: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. कोपरगाव ग्रामीण उपविभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात वीज ग्राहकांना दर्जेदार व अखंडित सेवा देत विक्रमी वीजबिल वसुलीची नोंद केली आहे.मार्च महिन्यात सर्व विक्रम मोडत वरिष्ठ कार्यालयाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.



जनमित्र, बाह्य स्त्रोत कर्मचारी, बिलिंग विभाग, शाखा अभियंते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली. या यशाबद्दल नुकताच गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता श्रीमती रंजना करसाळे या होत्या, तर संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता . प्रदीप वट्टमवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना वट्टमवार यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्याचे आवाहन केले.यावेळी सर्व कक्ष अभियंते, जनमित्र, बाह्य स्त्रोत कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अभियंता योगेश सोनवणे, अमोल बोडखे तसेच जनमित्र प्रतिनिधी प्रवीण कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.



सूत्रसंचालन वरिष्ठ तंत्रज्ञ सीताराम खंडागळे यांनी केले तर आभार सहाय्यक लेखापाल अल्केश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाखा अभियंता प्रशांत बोंडखळ, राहुल भालेराव, तेजस बनकर, शेखर ठोंबरे,अनिकेत निर्भवणे, सुशील पन्नाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!