banner ads

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या मयत सभासद वारसास २ लाखाचा विमा धनादेश प्रदान

kopargaonsamachar
0

 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या मयत सभासद वारसास २ लाखाचा विमा धनादेश प्रदान


कोपरगांव समाचार:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संवत्सर येथील सभासद कै. कोंडाजी भागवत भोसले यांच्या वारस पत्नी श्रीमती लिलाबाई भोसले यांना दोन लाख रूपये विमा धनादेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.




          संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी सभासद शेतक-यांचा अपघाती विमा उतरविला असुन त्याअंतर्गत कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी कै. कोंडाजी भागवत भोसले यांच्या अपघात प्रकरणाची सर्व कागदपत्रे पुर्तता करून आवश्यक क्लेम दाखल करावा म्हणून सुचना केल्या होत्या 

त्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेने काम केले. घरातील प्रमुख व्यक्तीचा जेंव्हा आपत्तीत मृत्यु होतो तेंव्हा संपुर्ण कुटूंब उघड्यावर पडते त्यासाठी विमा ही काळाची गरज आहे असे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे याप्रसंगी बोलतांना म्हणाले संचालक बापूसाहेब बारहाते, पांडुरंगशास्त्री शिंदे, बाळासाहेब शेटे, राजेंद्र भाकरे, बापूराव परजणे, संभाजी बोरनारे, प्रविण भोसले, अभय भोसले, गणपत भोसले, सुरेश भोसले, मधुकर भोसले आदि याप्रसंगी उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!