बॅच छोटा... पण संदेश मोठा !
मुख्यमंत्री फडणवीसांकडून विवेक कोल्हेंना मिळाला विश्वासाचा मान
कोपरगाव समाचार : मुंबईतील विधान भवन येथे पार पडलेल्या विधान परिषद शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांच्यातील आत्मीय नात्याची झलक पाहायला मिळाली. शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः विवेक कोल्हे यांच्या खिशाला विधान परिषद सदस्याचा अधिकृत बॅच लावला आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
राजकारणातील औपचारिक वातावरणात घडलेला हा साधा प्रसंग अनेकांसाठी विशेष ठरला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवलेला जिव्हाळा, युवा नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्याविषयीची आपुलकी यामुळे या क्षणाची विधान भवन परिसरात मोठी चर्चा रंगली.
भाजपमधील अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांची ओळख निर्माण झाली आहे. कमी वयात संघटनात्मक काम, प्रभावी जनसंपर्क आणि राजकीय निर्णयक्षमता यांच्या जोरावर त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर विशेष विश्वास व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय शैली ही नेहमीच नवीन नेतृत्वाला संधी देणारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी राहिली आहे. एखाद्या युवा चेहऱ्याला योग्य वेळी संधी देऊन त्याला पुढे आणणे, ही त्यांची खास कार्यपद्धती मानली जाते. विवेक कोल्हे यांच्या बाबतीतही याच शैलीची प्रचिती या प्रसंगातून आल्याची चर्चा सुरू आहे.
महायुती धर्म जपत विधानसभा निवडणुकीदरम्यान विवेक कोल्हे यांनी घेतलेली संयमी भूमिका, पक्षनिष्ठा आणि संघटनासाठी केलेले सातत्यपूर्ण काम यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक बळकट झाल्याचे मानले जाते. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ राजकीय नियुक्ती नसून त्यांच्या कार्याला मिळालेली मोठी दाद असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः बॅच लावल्याचा क्षण सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“युवा नेतृत्वाला मिळालेली ताकद”,
राजकारणात पदे आणि सत्ता महत्त्वाची असली तरी कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व अधिक प्रभावी ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यातील हा प्रसंग सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असुन.फडणवीसांचा विवेक कोल्हें वरील विशेष विश्वास अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत.






