संजीवनी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
कोपरगांव समाचार:-- माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदृष्टीतून सन २००४ साली आदिवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संजीवनी एकलव्य आदिवासी आश्रमशाळा या अनुदानित आश्रम शाळेची तालुक्यातील टाकळी येथे स्थापना झाली.
आज पावेतो अनेक आदिवासी मुलं मुली शिक्षणाने सक्षम होवुन स्वावलंबी बनली. परंतु नांदगाव तालुका, जि. नाशिक येथिल खेडेगावातील सचिन साईनाथ पवार याने संजीवनी मधुन मिळालेल्या शैक्षणिक तसेच विविध व्यक्तिमत्वाच्या पैलूंच्या मिळालेल्या संस्काराच्या जोरावर थेट एअर पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे टिकीट चेकर पदाला गवसणी घालुन संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्वप्नांची परीपूर्ति केली आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले.सुमित कोल्हे हे संजीवनी आश्रम शाळेचा माजी विद्यार्थी सचिन पवार याची एअर पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे टिकीट चेकर पदावर निवड झाल्याबध्दल त्याच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी डयरेक्टर -नॉनअकॅडमिक श्री डी. एन. सांगळे, प्राथमिक विभागाचे प्राचार्य आण्णासाहेब टकले, आदी उपस्थित होते.
सचिन पवार याने सन २०११ ते २०२१ असे १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेतले. येथुन मिळालेल्या शैक्षणिक प्रेरणेतुनच पुढे त्याने त्याचे शिक्षण पुर्ण केले आणि आता तो २६ मे पासुन सेवेत रूजु होणार आहे.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणुन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा वारसा संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे पुढे जात आहे. सचिन सारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातून प्रथमच नोकरदार होवुन स्वावलंबी बनले आहे, ही बाब खऱ्या अर्थानेे स्व. शंकरराव कोल्हे यांना आदरांजली ठरणारी आहे.
आम्ही शिकत असताना स्व. शंकरराव कोल्हे हे अधुन मधुन आमच्या निवासी शाळेला भेट द्यायचे व आमची विचारपुस करून तुम्हाला भविष्यात काय बनायचे, असे प्रश्न विचारत असत. तसेच ते प्रेरणादायी संवाद आमच्याशी साधायचे. त्यांच्या थोड्या वेळाच्या संवादामुळे आम्हाला महिनाभराची उर्जा मिळायची आणि आम्ही जिध्दीने अभ्यासासह इतर उपक्रमात जोमाने कामाला लागायचो. त्यांच्या प्रेरणेतुनच मी स्पर्धात्मक परीक्षा उत्तिर्ण झालो आणि आज मी माझ्या मागील अनेक पिढ्यांमधील कुटूंबातुन प्रथमच नोकरदार बनलो आहे. याचे सर्व श्रेय स्व. कोल्हे यांच्या विचारांसह येथिल व्यवस्थापन आणि सर्व शिक्षक यांना जाते
.- सचिन पवार (माजी विद्यार्थी)






