संवत्सरच्या मातीतून दरवळला सुगंध
‘आर आर प्रीमियम अगरबत्ती’ला ग्राहकांची पसंती
कोपरगाव समाचार:--संवत्सर येथील युवा उद्योजक रवींद्र पंडित वाघ यांनी सुरू केलेल्या “आर आर प्रीमियम अगरबत्ती” उद्योगाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कमी कालावधीतच या उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत असलेल्या रवींद्र वाघ यांनी स्वतःची जागा, मेहनत आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा नवा उद्योग उभारला आहे.
सध्या या उद्योगामध्ये गुलाब, मोगरा, लवेंडर, पायनापल यांसह तब्बल १२ विविध सुगंधांमध्ये अगरबत्ती उपलब्ध असून होलसेल तसेच रिटेल विक्री सुरू आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक सुगंध आणि किफायतशीर दर यामुळे ग्राहकांकडून उत्पादनाला मोठी पसंती मिळत आहे.
या उद्योगाला भेट देत श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष . मुकुंद काळे, दिनेश बोरनारे व सौ. छाया मुकुंद काळे यांनी उद्योगाची पाहणी केली. यावेळी रवींद्र वाघ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुकुंद मामा काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी व स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे. ‘आर आर प्रीमियम अगरबत्ती’सारख्या उद्योगांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे.







