banner ads

शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक पॅटर्न सुपरहिट

kopargaonsamachar
0

 

शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक पॅटर्न सुपरहिट; राज्यात सर्वाधिक विद्यार्थी पात्र


कोपरगाव समाचार :-  पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात  सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमने मिळवीला.  



या विद्यालयाचे तब्बल ३८४ विद्यार्थी पात्र ठरले. हि संख्या राज्यात सर्वाधिक आहे. अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. ते म्हणाले,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत पात्र ठरलेल्या ३८४ विद्यार्थ्यांत १० विद्यार्थ्यांनी अडिचशेहून अधिक, ७८ विद्यार्थ्यांनी दोनशेवीसहून अधिक तर १४२ विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक तर २२४ विद्यार्थ्यांनी १८० हून अधिक गुण प्राप्त केले.  इयत्ता आठवी मध्ये तेजस चोंडगीर २६४ , मंगेश कदम २६२ , वैभवी जाधव २६० , करण चरवांडे २५८ , धनंजय दहिफळे २५४   तर स्वराली काळे २५२ गुण मिळवीले. इयत्ता पाचवीत सार्थक जोरवर  २५६ , भूषण धोणे  २५४  , सार्थक शिंदे २५४ ,  युवराज गर्जे २५० ,संकेत साप्ते  २४८ , आर्यन वाळेकर २३८  , प्रद्युम्न घुमरे २३६ गुण मिळवीले.या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर,  तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.



   या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक  साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.


- हे आत्मा मालिक पॅटर्न चे यश आहे.  शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा व शालेय परीक्षांमध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे सातत्याने  राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. त्यात  शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे.
 
नंदकुमार सूर्यवंशीअध्यक्ष विश्वात्मकजंगली महाराज आश्रम ट्रस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!