banner ads

संजीवनीमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरी

kopargaonsamachar
0

 

संजीवनीमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरी

१७ विद्यार्थ्यांची काळोखे RMC मध्ये निवड
कोपरगांव समाचार --:  संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकचा प्लेसमेंट पॅटर्न पून्हा सिध्द झाला. सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील एकाच वेळी सतरा  विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नामांकित कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ घडवीण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होत असल्याने संजीवनीची ही घोडदौड सुरू आहे.




     या सतरा विद्यार्थ्यांना काळोखे आरएमसी या नामांकित कंपनीने चांगला पगार देऊ करीत नोकरीची संधी दिली. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे यात मोठे योगदान आहे. या निवडीमुळे अन्य विद्यार्थ्यांत देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत रविंद्र हेम्बाडे, मनोज हुळुले, अक्षय मडके, दर्शन शिंदे , साईरात शिंदे , शिवम  कोकरे, प्रणव कवडे, समर्थ सोनवणे, प्रथमेश  थोरात, ओम मढे, विशाल शिंदे, आयुश यादव, सौरभ बनकर, श्रावणी सोनजे, नम्रता रणशूर, सचिन घाडगे व वेदांत बनसोडे यांचा समावेश  आहे.



   या बाबत माहिती देताना प्राचार्य ए.आर. मिरीकर म्हणाले, परीपूर्ण शिक्षण आणि चांगली नोकरी मिळावी, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या पालकाचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक सातत्याने प्रयत्न करते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच प्रभावी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आदि उपक्रम राबविले जातात.  ‘संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरी’ हे समीकरण आता रूढ झाले आहे.
     संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी  विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंस डॉ. आर.एस.शेंडगे व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची टीम उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!