banner ads

माहेगाव देशमुखच्या विकासकामांची आमदार आशुतोष काळेंनी केली पाहणी

kopargaonsamachar
0

 

माहेगाव देशमुखच्या विकासकामांची आमदार आशुतोष काळेंनी केली पाहणी


कोपरगाव समाचार :तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत माहेगाव देशमुख येथे सुरु असलेल्या श्री दत्त देवस्थानच्या विविध विकास कामांची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी केली. यावेळी संथगतीने काम सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून सुरु असलेली विकास कामे दर्जेदार करून कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत



.
माहेगाव देशमुख येथील तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या श्री दत्त देवस्थान परीसरात विविध विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांसाठी आ. आशुतोष काळे यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जनसुविधा योजने अंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांसमवेत पाहणी करून सुरु असलेल्या कामाची ग्रामस्थ व ठेकेदाराकडून माहिती जाणून घेतली.

यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला श्री दत्त देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेषत: महिला भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या व दीर्घकाळ टिकतील अशा सोयी सुविधा निर्माण करा. स्वच्छतागृह तसेच इतर विकास कामे करतांना कोणतीही उणीव किंवा त्रुटी राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. सुरू असलेल्या घाटाचे बांधकाम अतिशय धीम्या गतीने सुरू असून त्या कामाला गती देवून हे काम वेळेत पूर्ण करावे.

श्री दत्त देवस्थानच्या विकासकामांच्या पाहणीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी जनसुविधा योजने अंतर्गत सुरू असलेल्या स्थानिक स्मशानभूमीच्या कामाची पाहणी केली. या कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी त्यांनी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेऊन गावकऱ्यांना अपेक्षित असलेल्या गरजेनुसार आणि दर्जेदार पद्धतीने काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी प्रसंगी श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे सदस्य, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!