banner ads

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक-शिक्षकांचा संगम

kopargaonsamachar
0

 

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक-शिक्षकांचा संगम

एस.एस.जी.एम.मध्ये मेळावा
कोपरगाव समाचार :- रयत शिक्षण संस्थेचे, श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.



आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. सरोदे यांनी, “महाविद्यालयातील ए आय सेंटर, माजी विद्यार्थी संघटना, NEP 2020, महाविद्यालय उपक्रम वर्ल्ड रेकॉर्ड वर्ल्ड ऑन डेंटल हायजिन, पोलीस भरती, शॉर्ट टर्म कोर्सेस, गुणवत्ता कक्ष, व्यावसायिक करिअरच्या संधी, शिक्षक आपल्या दारी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थी केंद्रित शिस्तीचे महत्व सांगितले. माणूस घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. असे प्रतिपादन करून १२ वीतील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”



कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य . संजय शिंदे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत गुणगौरव करण्यात आला.सदर मेळाव्यास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शिक्षकीय मनोगतांमध्ये सौ. दिघे, श्री. ठोंबरे, श्रीम. फुलपगार व श्रीमती फोपसे यांनी पालकांना उदबोधित केले. त्यानंतर संतोष खांडेकर, राहुल कासार, सौ. अनिता भोसले, धनश्री हसवाल या पालकांनी काही सूचना व अभिप्राय दिले.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री. कळमकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे यांनी केले.हा पालक मेळावा विद्यार्थ्यांना यशाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी त्रिवेणी संगम ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!