banner ads

आत्मा मालिकचा राज्यभर दबदबा; ७४ विद्यार्थ्यांसह राज्यात प्रथम क्रमांक

kopargaonsamachar
0

 

आत्मा मालिकचा राज्यभर दबदबा; ७४ विद्यार्थ्यांसह राज्यात प्रथम क्रमांक


कोपरगाव समाचार :- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून आयोजित ‘राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मराठी मिडीयम कोकमठाण या शाळेने राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला.



मराठी भाषेच्या व मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसारकरिता या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. मराठी विश्वकोश मंडळामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कुमार विश्वकोश यावर ही स्पर्धा घेण्यात आली.राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर पृथ्वीराज मोरे, अथर्व सानप, द्वितीय क्रमांकवर चैतन्य लखमले, साक्षी मुंगसे, तिसऱ्या क्रमांकावर कैवल्य अहिरे, धनंजय दरंदले, श्रावणी गोरे, अथर्व नलावडे, सिद्धार्थ पगारे, राशी सरोवर, सुरज वानखेडे, चौथ्या क्रमांकावर आराध्य अहिरे, ओम चव्हाण, श्रावण डोके, मयंक नहीरे, धीरज रीतापुरे, मनीष रोटे, तनिष्क शिंदे राज्यात पाचवा स्वरूप असळक, आदित्य भगत, स्वयंम दरवाडे, यशराज गलांडे, राहुल गर्जे, शिवम कांचनगिरे, आदित्य मोकाटे, अनिकेत पाटील, अरव नानेकर, ओमकार पुरकर, संग्राम शेळके पृथ्वीराज टोम्पे यांनी स्थान मिळवले.



या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रविंद्र देठे, रमेश कालेकर, मीना नरवडे, पर्यवेक्षक गणेश रासने, नयना शेटे, नितीन अनाप, सुनील पाटील, मराठी विषय शिक्षक दिपाली भोसले, दिनेश नाईक, राजश्री चाळक, आदिक कुदनर, सुनीता दळवी, गणेश रासने, सपना रावळ, अंकुश नरवडे यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!