banner ads

कोकमठाण येथे आ.काळेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

kopargaonsamachar
0

 

कोकमठाण येथे आ.काळेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन


कोपरगाव समाचार :- कोकमठाण येथे स्थानिक आमदार विकास निधीतून पुणतांबा रोड मारुती मंदिर ते देशमुख वस्ती या रस्त्याचे डांबरीकरण करणे (४०लाख), नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत पुणतांबा रोड ते धोंडीराम गायकवाड वस्ती ते रेलवाडी मारुती मंदिर या रस्त्याचे खडीकरण (३० लाख) व गावांतर्गत बाजारपेठ विकसित करून अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रेटिकरण करणे (२५ लाख) अशा एकूण ९५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.






यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असून मागील सहा वर्षात रस्ते विकासाच्या माध्यमातून दळणवळणाचे मार्ग अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. रेलवाडी रस्त्यावर असलेल्या अनेक मोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून, चिखलातून स्थानिक नागरिकांना, शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना प्रवास करतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता.

याच रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतातून शेतमालाची ने-आण करतांना जीव घेणी कसरत करावी लागत होती अशा अनेक अडचणी रस्त्यामुळे नागरीकांना येत होत्या. तसेच पावसाळ्यात बाजारपेठेतील चिखलामुळे भाजी विक्रेत्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या अडचणी दूर करण्यासाठी रस्ते आणि बाजारपेठेच्या विकासासाठी निधी देवून नागरीकांच्या अडचणी कायमच्या मार्गी लावल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल कोकमठाण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकरराव रोहम, दिलीपराव बोरणारे, सुरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, गौतम सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन विजय रक्ताटे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढे, गोदावरी खोरेचे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक विजयराव थोरात, शिरीष लोहकणे, सुदाम लोंढे, सुनील लोंढे, दादासाहेब साबळे, शांताराम लोहकणे, संजय थोरात, अरविंद रक्ताटे, दिपक रोहम, ज्ञानेश्वर रक्ताटे, संजय थोरात, विजय रक्ताटे, भाऊसाहेब काशिद, अनंत रक्ताटे, विशाल जाधव, डॉ.आशिष डूबे, सिद्धार्थ लोहकणे, शिवाजी कराळे, शरद फटांगरे, मधुकर रक्ताटे, संभाजी देशमुख, संतोष लोंढे, बनेमिया सय्यद, प्रशांत मोरे, वाल्मीक कापे, संभाजी गायकवाड, विजय थोरात, सुखदेव महाजन, प्रभाकर धिवर, विजय देशमुख, शांताराम त्रिभुवन, अविनाश निकम, कैलास कदम, सचिन जाधव, प्रभाकर आबक, तुषार बाराहाते, राजेंद्र रोहाम, अजित रक्ताटे, गणेश बाराहाते, अरविंद रक्ताटे, सदाशिव रक्ताटे, संदीप धिवर, राजेंद्र भाकरे, जावेद सय्यद, मधुकर रोहम, प्रकाश देशमुख, शिवाजी देशमुख, दिलीप देशमुख, दिलावर सय्यद, परसराम लोहकणे, राहुल सोळसे, अजय थोरात, विजय भोसले, सुरेश काशिद, अलाउद्दीन सय्यद, दत्तात्रय हाडोळे, दिपक रक्ताटे, रवींद्र खाडे, गोरक्षनाथ लोहकणे, बांधकाम विभागाचे रणजित तामखाणे, राजेंद्र रोहोम, ग्रामसेवक विजय पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!