सहकारमहर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी
कोपरगाव समाचार -: सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी करण्यांत आली. अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते आरतीसह धार्मिक विधी पार पडले.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिंडोरी प्रणित मोरेदादा यांच्या संकल्पनेतुन कारखाना कार्यस्थळावर २००६ मध्ये स्वामी समर्थ गुरूचरित्र पारायण सोहळ्यास सुरूवात करण्यांत आली. यंदाचे हे विसावे वर्ष होते. ९३ पारायणार्थी यात सहभागी झाले होते, तर वर्षभरातुन दोनदा याप्रमाणे ३९ पारायणे पार पडली. यात युवक युवतींसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, ज्ञानदेव औताडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, संजय औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, बाळासाहेब पानगव्हाणे, विलासराव वाबळे, सतिष आव्हाड, राजेंद्र कोळपे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, निवृत्ती बनकर, फकीरराव बोरणारे, कार्यकारी संचालक सुहास यादव, बापुसाहेब औताडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सीईओ शिव कुमार, तांत्रिक सल्लागार सीमांचल पांडा, संभाजीराव गावंड, रघुनाथ फटांगरे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कार्यकर्ते, कामगार आदि मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन चंद्रकांत जाधव यांनी केले. वसंत थोरात यांनी आभार मानले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.





