banner ads

डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती कोपरगावात उत्साहात साजरी

kopargaonsamachar
0

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती कोपरगावात उत्साहात साजरी


कोपरगाव समाचार:- कोपरगाव पॉवर हाऊस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती मेहुल बोर्डे निम्न स्तर लिपिक यांच्या अध्यक्षतेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली या संयुक्त जयंती महोत्सवासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक  कोल्हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी  कार्यकारी अभियंता संगमनेर प्रदीप वट्टमवार हे पूर्ण वेळ उपस्थित राहिले व त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तर प्रमुख वक्ता म्हणून सुंदरदास फंड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर सखोल असे मार्गदर्शन केले कोपरगाव शहर चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धांडे संगमनेर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोनावणे शिर्डीचे सुपुत्र व फलटण येथे उपकार्यकारी अभियंता असणारे प्रदीप देहरकर व स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी मार्गदर्शन केले. वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे संचालक सीताराम खंडागळे यांनी बाबासाहेबांवर क्रांतिकारी कविता सादर केली.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाल्मिक सानप यांनी सादर केले. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद बावा साहेब यांनी केले स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी समता व समरसता यातील भेद तसेच सामाजिक समता व विषमता या बाबत सविस्तर विवेचन केले प्रस्ताविकामध्ये पावर हाऊस कोपरगाव मध्ये होणाऱ्या या संयुक्त जयंतीचे महत्त्व याची सुरुवात व या अनुषंगाने अनेक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचार पसरवण्यासाठी होणारा उपयोग नमूद केला. हर्षद बावा व वाल्मिक सानप यांनी अनेक इतिहासाची दाखले सूत्रसंचालनातून दिली अतिशय सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे सानप यांची मुलगी वेदश्री सानपने भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर अतिशय मौलिक असे भाषण सादर केले आहे या महामानवाच्या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचा सत्कार सन्मान हा पुष्पगुच्छ किंवा फुलांचे हार घालून न करता डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे पुस्तक देऊन सन्मान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हा कार्यक्रम सुंदर बनवण्यासाठी आयोजक समितीने अतिशय मोलाचे कष्ट घेतलेले आहे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था कोपरगाव यांचे चेअरमन धनंजय बंद्रे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!