झिरोमधून हिरो बनायचं असेल तर ध्येय मोठं ठेवा –सहा.पोलिस निरिक्षक सुंदरडे
कोपरगाव समाचार:- प्रत्येकाच्या आयुष्याचा जीवन बदलण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यापर्यंत पोहोचायचे असेल तर जिद्द चिकाटी व मेहनत ठेवावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चतेचे प्रतीक आहे. त्यांना आदर्श ठेवून आपण काम केले पाहिजे. सुरुवातीला सर्वच झिरो असते. मात्र या झिरो मधून हिरो बनण्यासाठी शिक्षण व अभ्यास महत्त्वाचा असतो.ध्येय हे मोठे ठेवले तर माणूस हिरो बनतो असे प्रतिपादन कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शुभेच्छा देताना ते बोलत होते. सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेचे कृतिशील शिक्षक मनोहर वहाडणे व साई फायनान्स कंपनीचे संस्थापक बाबासाहेब जगताप यांचा गौरव शाळेच्या वतीने करण्यात आला. मनोहर वहाडणे व बाबासाहेब जगताप यांनी शाळेप्रती आदर युक्त भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. मराठी शाळेचा विद्यार्थी कुठेच कमी पडत नाही. असे त्यांनी सांगितले.
आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी भाऊक झाले होते. विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून मुख्याध्यापक मनोहर वहाडणे यांचे डोळे देखील ओले चिंब झाले होते.यावेळी सरपंच शकुंतलाताई गुडघे, सरपंच संजय गुडघे, मुख्याध्यापक महेंद्र रहाणे, पोलीस पाटील दगू गुडघे ,धर्मा जावळे,निरंजन गुडघे,किशोर जावळे, आबासाहेब जावळे,चिलु जावळे,कर्णा जावळे, बबलु जावळे,योगेश जावळे, अर्जुन जावळे, यमाजी जावळे, शाळेचे शिक्षक विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, अनिल पराड, सुरेश धनगर, बजरंग भागवत, शिक्षका कविता पानसरे, दीपक जावळे, हेमराज जावळे, लक्ष्मण जावळे, योगेश जावळे,चिलीया जावळे,शिवाजी दहे, शशीकांत चव्हाण,गजाराम गुडघे अदी उपस्थित होते. चंद्रविलास गव्हाणे, किशोर जावळे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन कु निकीता माळी व संचिका मिंड यांनी केले तर आभार विलास गवळी यांनी मानले.




