banner ads

स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून होणार साजरी

kopargaonsamachar
0

 

स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून होणार साजरी


कोपरगाव समाचार :-माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा २४ मार्च हा जन्मदिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा केला जातो. समाजसेवा, राजकीय,शिक्षण आणि सहकार,कृषी पाणी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस “सेवा हाच धर्म” या उदात्त भावनेतून विविध उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा रुजली आहे.






प्रेरणादिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू कुटुंबांना मदत, आरोग्य शिबिरे, रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वितरण, तसेच वृक्षारोपण यांसारखे अनेक समाजोपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचत असून, युवकांमध्ये सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यावर्षीही कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात प्रेरणादिन साजरा करण्यात येणार आहे. विविध संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.याच पार्श्वभूमीवर संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार असून, सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे.




प्रेरणादिनाच्या माध्यमातून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा सर्वांना मिळत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!