banner ads

चांदेकसारेच्या वर्गमित्रांची चाळीस वर्षानंतर भेट_ जुन्या आठवणींना उजाळा.

kopargaonsamachar
0

 चांदेकसारेच्या वर्गमित्रांची चाळीस वर्षानंतर भेट_ जुन्या आठवणींना उजाळा

कोपरगांव समाचार : -- तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यु इंग्शिल स्कुल इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणा-या सन १९८६ बॅचच्या माजी वर्ग मित्रांची चाळीस वर्षानंतर भेट झाली. त्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 





कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वर्गशिक्षक चांगदेवराव वक्ते होते.प्रारंभी शांताराम होन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारतीय सैन्यदलात मेजर या पदावर काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी श्री. शांतीलाल होन यांनी प्रास्तविक केले. इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेवुन बाहेर पडलेले अनेक माजी विद्यार्थी विविध उच्च पदावर कार्यरत आहेत त्यापैकी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहणारे अॅलेक्स उर्फ आदेश कापसे तसेच वर्गशिक्षक चांगदेवराव वक्ते यांचा सत्कार करण्यांत आला अध्यक्षपदावरून बोलतांना माजी वर्गशिक्षक . चांगदेवराव वक्ते म्हणाले की, शाळेत शिकत असतांनाची मैत्री नेहमीच अतुट असते. १९८६ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देतांना आम्हांस निश्चितच अभिमान आहे. या माजी विद्यार्थ्यांनी गुरूजनांसह आई वडीलांनी केलेल्या संस्काराची आठवण ठेवत जीवनातील अनेक अडथळर्याच्या शर्यती पार केल्या आहेत. शिक्षण हा समाज विकासाचा दागिना आहे तेंव्हा सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षण देवुन जीवनांत मोठे बनवावे. सत्कारास उत्तर देतांना .



 अॅलेक्स कापसे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गणेश परिसराच्या उत्कर्षासाठी सातत्यांने काम केले आता त्यांचे नातु व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे गणेश कामधेनुमध्ये लक्ष घालुन अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आहेत. उपस्थित सर्व माजी वर्ग मित्रांनी शाळेतील बाकावर बसत जुन्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी सर्वश्री. सौ. मंगल व नानासाहेब होन, सौ. सुनिता व सिताराम गुरसळ, सौ. कांता व विनायक जावळे, सौ व श्रीधर साळुंके, सौ. कमल व अॅलेक्स कापसे, सौ हिराबाई व द्रोणाचार्य होन, सौ. गंगुताई व सुधाकर होन, सौ. सुमन व विनायक पवार, भास्कर सोपान होन, कर्णा चव्हाण, भास्कर बी. होन, बारकु जगताप, सुनिल आहेर, प्रल्हाद पवार, रावसाहेब गुरसळ आदि उपस्थित होते. सर्व माजी वर्ग मित्रांनी आपापल्या परिने अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना आवश्यक ती मदत केली. शेवटी नानासाहेब होन यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!