banner ads

आसाम राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या टीमकडून कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी

kopargaonsamachar
0

 

आसाम राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या टीमकडून कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी


कोपरगाव समाचार:-- आसाम राज्याची ग्रामविकास विभागाची टीम आज कोपरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेटी देऊन विविध शासकीय योजनांची माहिती घेतली.



 या टीम सोबत आसाम पंचायतराज व ग्रामविकास आयुक्तालयाचे सह आयुक्त ध्रुबज्योती नाथ, रणजीत दास, .निलोतनाथमिश्रा,. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगरचे किरण साळवे ,पंचायत समिती कोपरगाव चे गटविकास अधिकारी संदीप दळवी ,.विस्तार अधिकारी कृषी बाळासाहेब साबळे, शाखा अभियंता अश्विन वाघ ,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यावेळी उपस्थित होते. 

यावेळी पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन पंचायत समिती कार्यालयात उभारण्यात आलेल्या डेमो हाऊसची देखील पाहणी केली. तसेच कमिटीने प्रधानमंत्री आवास योजना व विविध आवास योजना अंतर्गत चालू असणारे कामे तसेच 15 वित्त आयोग राज्य योजनांचा व ग्रामपंचायत स्वनिधी मधील कामकाजाची पाहणी केली. यावेळी कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या कामकाजाबाबत कमिटीने समाधान व्यक्त केलं असून. 

सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती घेतली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!