banner ads

कोपरगावात शिवजयंती उत्साहात साजरी होणार

kopargaonsamachar
0

 

कोपरगावात शिवजयंती उत्साहात साजरी होणार


कोपरगाव समाचार :--

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.
शिवजयंतीच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवाभिषेक व शिवजन्म सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर शिवरायांच्या कार्याला अभिवादन करणारे विविध प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.




 प्रकाशयोजना, फुलांची सजावट तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने नटविण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना अभिमान वाटावा, अशी भव्य व शिस्तबद्ध शिवजयंती साजरी करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.शिवाजी महाराज हे स्वराज्य, सुशासन, शौर्य, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजात एकोपा, राष्ट्रभक्ती व कर्तव्यभावना वाढीस लागावी, हाच या शासकीय शिवजयंती सोहळ्याचा उद्देश आहे.या शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!