कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती
कोपरगाव समाचार :--कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत सुरू राहावा, यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबत पंचायत समिती प्रशासनाने अधिकृत आदेश जारी केले असल्याने तालुक्यातील २९.ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आला असून हा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदींनुसार तसेच शासनाच्या स्पष्ट निर्देशांनुसार घेण्यात आला
आहे.ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर नियमानुसार निवडणुका होणे अपेक्षित असते. मात्र, विविध प्रशासकीय व कायदेशीर कारणांमुळे निवडणुका होऊ न शकल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विचार करून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शासनाने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्यांची मुदत संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्तीबाबत यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते.त्या अनुषंगाने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी प्राप्त अधिकारानुसार संबंधित ग्रामपंचायतींवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या ग्रामपंचायतींचा सर्व प्रशासकीय कारभार नियुक्त प्रशासकांमार्फत चालविला जाणार आहे. या २९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कधी घेतली जाणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली आहे.या २९ ग्रामपंचायती खालील
प्रमाणे.अंजनापूर,अंचलगाव,आपेगाव,उक्





