banner ads

कोपरगाव नगरपालिका शाळा संगणक कक्षाच अनावरण

kopargaonsamachar
0

 

कोपरगाव नगरपालिका शाळा संगणक कक्षाच अनावरण

कोपरगाव समाचार :-- कोपरगाव नगरपालिका शाळा नं. ५, बेट, कोपरगाव येथे झी हाईव्ह सोलुशन्स च्या वतीने सी आर सी फंडातून दिलेल्या संगणक कक्षाचे अनावरण करण्यात आले.



झी हाईव्ह सोलुशन्स, पुणे कंपनीचे मालक अर्शद इनामदार यांनी सी. आर. सी. फंडातून शाळेकरिता संगणक संच, फर्निचर, पेंटिंग इ. सोयीनी युक्त संगणक कक्ष उभारणी केली.संगणक कक्षाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्याधिकारी सुहास जगताप,अनिल आव्हाड -नगरसेवक,पालक, विद्यार्थी यांचे उपस्थितीत संपन्न झाले.


मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थितांचे विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून स्वागत केले. विलास माळी यांनी प्रास्ताविकात शालेय उपक्रम व लोकसहभागाचा उहापोह केला.सर्व मान्यवरांनी संगणक कक्ष अनावरण करून सुविधाची पाहणी केली. शाळेच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संकल्पना फाडेशन चे अध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे व सचिव गणेश सपकाळ यांना "सन्मानचिन्ह "देऊन गौरविण्यात आले. 'बाप 'कविता संग्रह प्रकाशित झालेबद्दल कवयित्री व आदर्श शिक्षिका सौ.विजया विठ्ठल जाधव -माळी यांना सन्मानचिन्ह देऊन नगरपालिकेने गौरव केला. झी हाईव्ह सोल्युशन्स कंपनी चे मालक यांना सन्मानचिन्ह देऊन उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गौरव केला.शिक्षिका सौ. नसरीन इनामदार -पठाण यांच्या योगदानाबद्दल गावाकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी शाळेप्रती कृतद्यता व्यक्त करून मुलाने केलेल्या दातृत्वाबद्दल आनंद व्यक्त केला. अर्शद इनामदार यांनी आजच्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण व साक्षरता खुप आवश्यक असून गोरगरीब विद्यार्थ्यांना योग्य साधने व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे मत मांडले. संगणक कक्षाचा विद्यार्थ्यांना भावी जीवनात नक्कीच उपयोग होऊन त्यांचा न्यूनगंड कमी होईल. सुहास जगताप यांनीही संगणक व तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. तसेच दानशूर व्यक्तींचे नगरपालिकेच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले. कवयित्री सौ. विजया जाधव यांनी मनोगतात मराठी भाषा दिना निमित्त मातृभाषेचे महत्व सांगून आपली स्वरचित "बाप "कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात जितेंद्र रणशूर यांनी शालेय जीवनात आपले अनुभव कथन केले. नगरपालिका शाळांकरिता प्रशासन नेहमी सहकार्य करील याचे आश्वासन दिले. संगणक कक्ष महिन्यात पूर्ण करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शालेय जीवनात शाळेतील शिक्षकांचे निस्पृह कार्य, पालक विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता वाखाणण्याजोगी आहे असे प्रतिपादन केले. अमोल कडू यांनी आभार मानले.सुनिल रहाणे यांनी सूत्रसंचलन केले. नगराध्यक्ष पराग संधान यांचे सहकार्य लाभले.

कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप व नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.यावेळी जितेंद्र रणशूर -उपनगराध्यक्ष, सुहास जगताप -मुख्याधिकारी, अनिल आव्हाड -नगरसेवक, अर्शद इनामदार, झी हाईव्ह सोलुशन्स, अन्सार इनामदार - सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक,नगरपालिका अभियंता श्री जोशी,फिरोज मणियार,शिरीन मणियार,रजिया इनामदार,सना इनामदार,डॉ. मयूर तिरमखे, गणेश सपकाळ,जाकीर पठाण,विनोद नाईकवाडे, बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम, विलास गोंदकर, राहुल शिंदे, प्रसाद पऱ्हे, सचिन परदेशी, भाऊसाहेब शिंदे,पूनम गगे -शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, कावेरी गहिरे, अर्चना वाघमारे, लिलावती जमधडे,प्रकाश जमधडे, मोरे ताई, सुनीता शिंदे,अलिया पठाण,कशिश पठाण, शाळेचे शिक्षक विलास माळी, सुनिल रहाणे, नसरीन इनामदार,अमोल कडू,माणिक कदम,अमित पराई,मुबब्बशीर खान,अर्जुन शिरसाट, अरुण पगारे, सनी गायकर, , प्रताप वळवी, वैशाली मुजमुले -रहाणे, शबनम शेख,गोपाळ कोळी, प्रसन्न आल्हाट व मारुती देवस्थान ट्रस्ट सदस्य, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!