येसगाव येथे एआय लॅबचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
कोपरगाव समाचार:---येसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे सन २०२५–२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा . सौ. रेणुका कोल्हे यांनी . एआय लॅबसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही आधुनिक तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सरपंच पुंडलिक गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य . कपिल सुराळकर, ॲड. उत्तमराव पाईक, दगडू दरेकर, बाबासाहेब म्हस्के, शंकरराव पाईक, माजी सरपंच सौ. नंदिनी सुराळकर, माजी सरपंच . सचिन गायकवाड, अतुल सुराळकर, किरण गायकवाड, डॉ. सुयोग भंडारी, ह.भ.प. सागर महाराज चव्हाण, किरण सुराळकर, पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे, मुख्याध्यापक ठाकरे आर. एम.,शिवाजी भुतांबरे , गंगाधर घोरपडे आदीसह पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, माजी विद्यार्थी संघ व सर्व सेवकवृंद उपस्थित होते.
लॅब उभारणीसाठी कलाशिक्षक दीपक खालकर, संगणक शिक्षक कृष्णा गायकवाड , एआय विभाग प्रमुख भिका बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्यछटा, समूहगीत तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व स्तरातून विद्यार्थ्यांच्या कला व गुणांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देवस्थळे, सौ. नंदा बढे व रामदास गायकवाड यांनी केले. आभार योगेश कदम यांनी मानले.









