कोपरगावात शासकीय मका खरेदी केंद्राचा शुभारंभ
कोपरगाव समाचार :-- कोपरगाव येथे शासकीय मका खरेदी केंद्राचा शुभारंभ तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कोपरगाव व राहता तालुक्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रासाठी नियुक्त केलेली अधिकृत संस्था मे बहादराबाद विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी व पुरवठा विभाग तहसील कार्यालय कोपरगाव यांनी संयुक्तिक तपासणी करून चांगल्या प्रतीची व शासनाला अभिप्रेत असलेली एफ.ए.क्यू दर्जाचीच मका खरेदी करावी अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी दिल्या.
त्याचप्रमाणे शासकीय हमीभाव केंद्रावर साधारणपणे एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून त्या सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी केली जाईल त्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी मका शासकीय हमीभाव केंद्रावर देऊन आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्ष,तालुका पुरवठा अधिकारी अमोल फोपसे,निरीक्षक अधिकारी गायकवाड ,पुरवठा निरीक्षक अदिती भालेराव गोदामपाल गणेश गरुड,पुरवठा सहाय्यक निलेश चौधरी,रजनी पवार , सरपंच विक्रम पाचोरे संचालक बाळासाहेब पाचोरे,सुखलाल गांगवे,राहुल पाचोरे,गजानन ठोंबरे यांसह बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.




