कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणी व सर्व कमिट्या बरखास्त
नवीन चेहऱ्यांना संधी देणार आ.आशुतोष काळे
कोपरगाव समाचार :---मागील दहा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना करण्यात आलेल्या कार्यकारणी व त्यांच्या सर्व कमिट्या बरखास्त करण्यात आल्या असून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारणी व कमिट्यांची स्थापना केली होती.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकारणी व कमिट्या पुढील प्रमाणे होत्या. कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सिनिअर) अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी,कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाांव शहर विद्यार्थी कॉंग्रेस पार्टी.
राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी डॉक्टर सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी वकील सेल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी सेवा दल शहराध्यक्ष व कमिटी, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल शहराध्यक्ष व कमिटी,उत्तर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) युवक काँग्रेस, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस, सोशल मीडिया उत्तर जिल्हाध्यक्ष, डॉक्टर सेल उत्तर जिल्हाध्यक्ष, ओबीसी जिल्हा अध्यक्ष, ऊत्तर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस पार्टी, विद्यार्थी कार्याध्यक्ष उत्तर जिल्हा,अशा विविध कमिट्यांवर कोपरगाव शहरातील कार्यकर्त्यांची नेमणूक केली होती. परंतु नव्या उमेदीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी या उद्देशातून व कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिक संघटन वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोपरगाव शहराच्या सर्वच भागातील कार्यशील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांना कोपरगाव शहराच्या पक्ष कार्यकारिणीवर संधी देण्यात येवून नवीन कार्यकारणी त्यांच्या अध्यक्ष व कमिट्या तयार करण्यात येणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे




