banner ads

किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध - विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध - विवेक कोल्हे

कोपरगाव समाचार :-- प्रत्येक जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनुदानित खाजगी शाळेत पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना प्रधान मंत्री शक्ती योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. पण या योजनेत काम करणारे कर्मचारी यांना फक्त 83 रुपये रोज मिळतो. हे मानधन खूपच अत्यल्प आहे. किमान वेतन कायद्यानुसार यांना मानधन मिळवुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शाखा कोपरगाव तालुका आयोजित मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगितले.



 
कोपरगाव येथील एम के आढाव विद्यालय येथे सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कोपरगाव तालुक्याचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सविता विधाते, जिल्हा सचिव विद्या अभंग, तालुका अध्यक्ष प्रकाश पानपाटील, उपाध्यक्ष किरण कदम, सोनाली ठाणगे, सुरेश गायके, गुलाब शेख, ज्ञानदेव झिरपे, आप्पा साळुंखे, सारिका गडाख,प्रिया रोकडे, आशा घोलप, कल्पना क्षीरसागर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी विवेक कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक महिलांनी विविध समस्या मांडल्या. त्या सर्व समस्या विवेक कोल्हे यांनी समजावून घेतल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष सविता विधाते, मोनाली ठाणगे, विद्या अभंग यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी तालुका अध्यक्ष प्रकाश पानपाटील यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!