विद्यार्थी सहायक समितीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात
कोपरगाव समाचार :--भगवान चक्रधर स्वामींनी सांगितले आहे की "ज्ञान हीच खरी संपत्ती" आहे. ज्ञान प्राप्त करण्याचा उपदेश स्वामींनी या भूतलावरील मनुष्य जीवाला केला आहे.स्वामींनी सांगितले की ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही वय, जात, धर्म किंवा लिंग यांचा विचार करू नये. याच स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन स्वामींचे भक्त हिरालाल महानुभाव यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे साधन उपलब्ध करून दिले आहे याचाच एक परिपाक म्हणून कोपरगाव तालुका विद्यार्थी सहायक समितीच्या दिनदर्शिकेचा आज प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ही दिनदर्शिका समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन संवत्सर येथील महानुभाव आश्रमाचे महंत राजधर बाबा यांनी केले आहे.
भगवान चक्रधर स्वामी यांच्या "ज्ञान हीच खरी संपत्ती " या विचाराने प्रेरित होऊन हिरालाल महानुभाव यांनी स्थापन केलेल्या कोपरगाव तालुका विद्यार्थी सहायक समितीचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात शहरातील कलश बँक्वेट हॉल येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी दिनदर्शिकेचे प्रकाशन महंत राजधर बाबा,
संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे,
माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव,
नगरसेवक विक्रमादित्य सातभाई,नगरसेविका दीपाली उदावंत,गजानन शेर्वेकर,अरुणशेठ भोजने,
जयश्री भोजने,ज्ञानेश्वर परजने,आर्किटेक रविकिरण डाके,
सचिन धर्मापुरीकर,कल्पेश शहा,प्रभाकर वाणी,श्री. वाबळे,रामदास खैरे आदींच्या हस्ते पार पडले.
यावेळी एस जे एस शिक्षण समूहाचे चेअरमन चांगदेव कातकडे, कार्यकारी संचालक प्रसाद कातकडे, डॉ. निखील महानुभाव,डॉ. शुभांगी महानुभाव, डॉ.प्रतीक्षा महानुभाव,पत्रकार राहुल देवरे,प्रा.मोहन सांगळे,योगेश वाणी, कल्पना महानुभाव,पत्रकार महेश जोशी, अरुण आहेर,केतकी सातभाई,नमिता मराठे,वंदना चिकटे,शैला लावर,वृषाली किर्लोस्कर,सुनैना केळकर,स्वाती मुळे, श्री चक्रधर स्वामी आय टी आय महाविद्यालयाचे प्राचार्य वाकचौरे सर, चक्रधर स्वामी डी एड कॉलेज च्या प्राचार्य विजया थोरे,नामदेवराव परजने लॉ कॉलेजचे प्राचार्य नामदेव उबाळे , सेक्रेटरी प्रा. राजेंद्र साळुंके,श्री.चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या वंदना मराठे आदिसह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महंत राजधर बाबा म्हणाले की,
भगवान चक्रधर स्वामींचे ज्ञानविषयीं विचार आजही प्रेरणादायक आहेत आणि समाजातील सर्व वर्गातील लोकांना त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्याचं विचारांनी प्रेरित होऊन हिरालाल महानुभाव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे व्यावसायिक शिक्षण अल्प दारात मिळावे यासाठी अथक प्रयत्न केले आहे. त्यामुळे आज कोपरगाव सारख्या भागातील विद्यार्थी वकील, आय टी आय,नर्सिंग कॉलेज,डी.एड, नेचरोपॅथी हॉस्पिटल यासारखे शैक्षणिक दालने खुली करून देत हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहे. याचं माध्यमातून शहरातील प्रत्येक नागरिकाला आगामी वर्षात होणारे सण उत्सव तसेच शहरातील सर्व प्रतिष्ठित मंडळींचे वाढदिवस व इतर माहिती मिळावी याबाबतची दिनदर्शिका देखील समाज हिताच्या भावनेने प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिकांची देखील माहिती देण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फायदा नागरिकांना होणार आहे. यावेळी अधिक बोलताना राजधर बाबा म्हणाले की, चक्रधर स्वामींनी ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले आहे त्यात परमार्थ ज्ञान आणि व्यवहार ज्ञान. परमार्थ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तर व्यवहार ज्ञान म्हणजे सांसारिक ज्ञान होय. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करायचा असतो.ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढविण्यासाठी किंवा दुसऱ्यांना हिन वागणूक देण्यासाठी करु नये. चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला आहे त्यात श्रवण, मनन आणि निदिध्यास. श्रवण म्हणजे ज्ञान प्राप्त करणे, मनन म्हणजे ज्ञानाचे विचार करणे आणि निदिध्यास म्हणजे ज्ञानाचे आचार करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती मुळे यांनी तर आभार डॉ. निखिल महानुभाव यांनी मानले आहे.




