banner ads

कार्तिक पठारेची आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

kopargaonsamachar
0

 

कार्तिक पठारेची आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड



कोपरगाव समाचार :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक पठारे याने हॉकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत कार्तिकने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या दमदार कामगिरीची दखल घेत त्याची निवड टि.जे. महाविद्यालय, खडकी (पुणे) येथे आयोजित आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी करण्यात आली असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.




पुणे येथे झालेल्या स्पर्धेतह कार्तिकने आपल्या खेळातील सातत्य, वेगवान चाली आणि संघभावनेच्या जोरावर उत्कृष्ट खेळी साकारली. परिणामी त्याने पुन्हा एकदा महाविद्यालयाचे नाव उंचावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याची निवड एल.एन.सी.टी. विद्यापीठ, भोपाळ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी करण्यात आली.भोपाळ येथे झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेतही कार्तिकने आपली छाप पाडली. त्याच्या उत्कृष्ट खेळाचे आणि तांत्रिक कौशल्याचे मूल्यमापन करत निवड समितीने त्याची थेट अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी निवड केली आहे. ही देशव्यापी स्पर्धा संबलपूर विद्यापीठ, ओडिसा येथे होणार असून ही कार्तिकसह संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे.



कार्तिक पठारेच्या मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैताली काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारे,महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!