banner ads

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

kopargaonsamachar
0

 

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


कोपरगाव समाचार :- , स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या , थोर समाज सुधारक क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळी बोर्डिंग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



यावेळी कार्यकर्त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देतांना सांगितले की, ज्या काळात चूल आणि मुल हीच स्त्रीची व्याख्या होती, महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेतले आणि स्री शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर विधवा पुनर्विवाह, स्त्री-पुरुष समानता, दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. सामाजिक परिवर्तन चळवळीच्या त्या आधारस्तंभ होत्या. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करून महिलांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.




त्यांचे कार्य म्हणजे मानवतेचे खरे दर्शन असून त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा देतात. आपण सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून समानता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण एक सशक्त, समताधिष्ठित आणि प्रगत समाज घडवण्याचा प्रयत्न करणे हीच खरी त्यांना मानवंदना असेल अशा भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!