banner ads

दिवसा शेतीला वीज पुरवठा उपलब्ध करून देऊ ! आश्वासनानंतर पोहेगांवचे आंदोलन स्थगित

kopargaonsamachar
0

 दिवसा शेतीला वीज पुरवठा उपलब्ध करून देऊ ! आश्वासनानंतर पोहेगांवचे आंदोलन स्थगित

कोपरगाव समाचार :-- शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी पोहेगाव पंचक्रोशी साठी विद्युत वितरण कंपनीने शेतीला दिवसा वीज पुरवठा द्यावा अशी मागणी केली होती. वन्य प्राण्यांचा त्रास व बिबट्याची धास्ती यामुळे रात्री शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. सरकारने महाराष्ट्रात दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असताना पोहेगांव परिसर यापासून वंचित का ठेवता असा प्रश्न त्यांनी उपलब्ध केला होता.




10 जानेवारीला विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात इशारा औताडे यांनी पोहेगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बरोबर घेत दिला होता.
याची दखल घेत काल संगमनेर येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, राहत्याचे उपकार्यकारी अभियंता डी डी पाटील यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व शेती पंपांना दिवसा 31 जानेवारीपर्यंत पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे नितीनराव औताडे यांनी सांगितले.
पोहेगांव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता डी डी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोक नवले, विद्युत वितरण कंपनीचे इंजिनियर श्री गव्हाळे, उपसरपंच अमोल औताडे, अशोक औताडे संजय औताडे, रमेश औताडे, एम टी रोहमारे, नरहरी रोहमारे, राजेंद्र गरुड, राजेंद्र औताडे, संदीप औताडे, अनिल औताडे, किशोर जावळे, निरंजन गुडघे, संजय गुडघे, विजय मिंड ,कर्ना जावळे, हरिभाऊ जावळे ,भास्कर गुडघे, आप्पासाहेब औताडे, प्रकाश रोहमारे, नितीन नवले ,लक्ष्मण पवार ,माऊली पवार, अरुण डोके ,प्रशांत रोहमारे, कैलास औताडे ,राजेंद्र नवले, आप्पासाहेब गोसावी, महिंद्र औताडे , रावसाहेब औताडे, सचिन नवले ,सोमनाथ वाके अदी उपस्थित होते.प्रास्ताविकात नितीन औताडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांची बाजू मांडत दिवसा विजेची मागणी केली. दिवसा किमान आठ तास शेतकऱ्यांना विज उपलब्ध करून द्या. रात्री बिबट्याच्या दृष्टीने शेतात जाणे बंद झाले आहे. सरकारने जर दिवसा लाईट दिली तर आपण पोहेगांवला का देत नाही असा सवाल त्यांनी उपलब्ध केला.




यावर तोडगा काढत विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार व उपकार्यकारी अभियंता डी डी पाटील यांनी सोलर प्लँटचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कोपरगावला अधिकचा विद्युत पुरवठा होणार आहे. मात्र त्यासाठी अजून 20 ते 25 दिवसाचा अवधी जाणार आहे. 31 जानेवारी पर्यंत सर्व काम पूर्ण होऊन पोहेगांव परिसरात दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या शेतात लोणकळत असणाऱ्या विद्युत तारा, दुर्घटना घडतील अशा ठिकाणी असलेले विद्युत रोहित, पोल शिफ्टिंग अदी समस्याचा पाढाच शेतकऱ्यांनी वाचला.
या सर्व समस्या वर तोडगा काढण्यासाठी वेगळी टीम दिली जाईल असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.
शेवटी सर्वांचे आभार अमोल औताडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!