संजीवनीच्या सात विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
सॅप प्रमाणित कोर्सचा निवडीसाठी फायदा
कोपरगाव समाचार :-- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बी.च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांना परिक्षेच्या निकालापूर्वीच ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) बिझिनेस सोल्युशन्स या तेल आणि वायु क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. या महाविद्यालयात सॅप प्रमाणीत कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हि सुवर्णसंधी मिळण्यास मदत झाली. त्यासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने पुढाकार घेतला. अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग हा उद्योग जगताच्या संपर्कात असतो. या विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंतिम वर्षात शिकत असलेल्या बी.टेकच्या या सात विद्यार्थ्यांना हि संधी मिळाली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, सॉफ्ट स्किल, मुलाखतीचे तंत्र व कौशल्या बरोबरच सॅप प्रमाणित कोर्सद्वारे अधिकचे सॉफ्टवेअर प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांच्या कठीण निवड प्रक्रियेत यश मिळविणे सुकर होते. असा आजवरचा अनुभव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सॅप (सिस्टिम्स, अॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्टस् ईन डेटा प्रोसेसिंग) या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या सॅप प्रमाणित कोर्सच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवीणे सोपे होते.अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाल्यावर बरेच विद्यार्थी सॅप सारखे कोर्स करण्यासाठी मोठ्या शहरात जातात. परंतु संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पदवी पुर्ण करीत असतानाच सॅपचे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची वेळेची आणि पैशांची बचत होते. ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) बिझिनेस सोल्युशन्स या कंपनीत नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अथर्व राधाकिसन सानप, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अश्विनी विजय गोडगे, ऋतुजा भाऊसाहेब हर्दे, अर्पिता गणेश रहाणे, रविशा निळकंठ शिंदे , रविशा रवी हलवाई व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या धनश्री राजेंद्र मरकड यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल तिडके, डॉ. प्रसाद पटारे, डॉ. एन.डी. कपाले, आदी उपस्थित होते.
---
मी पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्या बहिणीने संजीवनी फार्मसी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यामुळे आम्हाला संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची उपलब्धी माहिती होती. चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवीण्याचे माझे ध्येय आज पूर्ण झाले. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये सॅप मार्फत प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणामुळे माझ्या यशाचा मार्ग सुकर झाला. आई वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले.
-धनश्री मरकड, विद्यार्थीनी.




