banner ads

संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांना नोकरी

kopargaonsamachar
0

 

संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांना नोकरी


जापनीज भाषा प्रशिक्षणाचे  फलीत
कोपरगांव समाचार:-

संजीवनी इंजिनिअरींग कॉलजचा ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग (टी अँड  पी) आपल्या अंतिम वर्षाच्या  विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी सतत प्रयत्नशिल  असतो. अशाच  प्रयत्नातुन डीजी फ्युचर टेक इंडिया कंपनीने नुकत्याच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. या ड्राईव्हमध्ये कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे दोन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच आकर्षक  पॅकेज देवुन नोकरीसाठी निवड केली आहे, महाविद्यालयातच शिक्षण  घेत असताना दिलेल्या जापनीज भाषेचे  प्रशिक्षणाचा फायदा या विद्यार्थ्यांना झाला, अशी  माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की कंपनीने इन्फर्मेशन टेक्निॉलॉजी विभागातील कल्याणी यादव दैणे व वेदांत जालिंदर शिंदे  आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या जागृती दगडू चौधरी व सानिया करीम पठाण यांची नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नामांकित राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये सुरू असलेली निवड ही कौशल्याधारित शिक्षण ,आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योगमान्य प्रशिक्षण  यांचे उत्तम द्योतक आहे. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या रोजगार संधी उपलब्ध होत असुन त्यांच्या करीअरचा भक्कम पाया महाविद्यालयातच तयार होत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली व विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते

   मी अहिल्यानंगर जवळच्या शेंडी  या खडेगावच्या शेतकऱ्याचा  मुलगा. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी विशेष  परीश्रम घेते, हे मला येथे प्रवेशापूर्वी  माहित होते. येथेच प्रवेश  घेण्यासाठी मी इ. १२ वी ला खुप अभ्यास केला आणि माझ्या इच्छेनुसार मला येथे प्रवेश  भेटला. आमचे कॉलेज ऑटोनॉमस असल्यामुळे येथे आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाले. शिवाय  येथे जापनीज भाषेचे  प्रशिक्षणही कॉलेज चालु असतानाच मिळते, त्याचाही मला खरा फायदा झाला. माझी मुलाखत जापनीज भाषेतच  झाली. कारण या कंपनीचे बहुतांशी  ग्राहक हे जपान मधिल आहेत. म्हणुन डीजी फ्युचर टेक इंडिया कंपनीने मला माझे तांत्रिक ज्ञान हे जपानी भाषेतच  विचारले. टी अँड  पी विभागाने आमचा मुलाखतींचा भरपुर सराव करून घेतला होता. या सर्वांचा परीपाक म्हणुन डीजी फ्युचर टेक इंडिया या आयटी सोल्युशन्स पुरविणाऱ्या  कंपनीने माझी निवड केली व माझे स्वप्न पूर्ण केले.
वेदांत शिंदे  


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!