संजीवनीला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त
सिध्दी तांबेची महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघात निवड
कोपरगांव समाचार:-
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या सिध्दी महेंद्र तांबे हिची १७ वर्षे वयोगटांतर्गत महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल मुलींच्या संघात निवड झाली. ही निवड महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद , पुणे व विभागीय क्रीडांगण, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुर येथे झाली. या निवडीसाठी राज्यातील १६० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात १६ खेळाडूंची निवड करण्यात आली. यात सिध्दीचा समावेश आहे. संजीवनी इंटरनॅशनल स्कूल राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी कायम पुढे आहे, हे सिध्दीने पुन्हा एकदा सिध्द केले आहेे, अषी माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनीच्या सॉफ्टबॉल मुलींच्या संघाने जिल्हा व विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत थेट राज्य पातळीवरील स्पर्धेत प्रवेश मिळविला. यात सिध्दीने आपल्या खेळाचे कसब दाखविले आणि तीने राज्य निवड समितीचे लक्ष वेधुन घेतले. सिध्दीच्य माध्यमातुन संजीवनीला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. छत्तिसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सिध्दी आपला खेळ महाराष्ट्राच्या संघातुन प्रदर्शित करणार आहे, ही बाब संजीवनीच्या दृष्टीने भूषणावह असणार आहे.
सिध्दी तांबे हिच्या यशाबद्धल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सिध्दी तांबे, तिचे वडील महेंद्र तांबे, आई पुर्णिमा तांबे यांचे अभिनंदन करून सिध्दीला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी सिध्दी व तिच्या आई वडीलांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या रीना राजपुत क्रीडा शिक्षक विरूपक्ष रेड्डी उपस्थित होते.
सिध्दी तांबे हिची राज्य सॉफ्टबॉल संघातील निवड ही तिच्या प्रतिभा, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे. तिच्या या यशामुळे संस्थेचा गौरव अधिक वाढला असुन आगामी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ती उत्तम कामगिरी करून राज्याचे नाव उज्वल करेल, असा विश्वास आहे. संजीवनी इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेल्या परीश्रमांवरती पालकांचा विश्वास आहे. अशा पध्दतीने पालक, विद्याथी व संस्थेचे शिक्षक यांच्या समन्वयातुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, ही संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची प्रथम प्राधान्यता आहे.
-डॉ.मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स




