कोपरगावात संपुर्ण लक्ष्य व बुनियादी सत्य शिबिराचे आयोजन
तेजज्ञान फाउंडेशनच्या (हॅपी थॉट्स) चा उपक्रम
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणा-या तेजज्ञान फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेतर्फे रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी ज्ञान ध्यान केंद्र, महिला महाविद्यालया जवळ गरिमा नगरी, स्टेशन रोड, कोपरगाव जि. अहिल्यानगर या ठिकाणी सकाळी ९.०० ते सायं. ५.३० या वेळेत संपुर्ण लक्ष्य व बुनियादी सत्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री निर्मित महाआसमानी परमज्ञान शिबिरामध्ये आजवर लाखो लोकांच्या जीवनात आनंद, शांतता आणि स्थिरता निर्माण झाली आहे.
हे शिबिर तीन भागांमध्ये घेतले जाते संपुर्ण लक्ष्य शिबिर, बुनियादी सत्य शिबिर आणि ब्राइट रिस्पॉन्सिबिलीटी शिबिर. या शिबिरात सहभागींना सोपी परंतु अत्यंत प्रभावी तंत्रे दिली जातात, जी त्यांना जीवनातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास, अंतर्गत शक्ती विकसित करण्यास आणि चिरस्थायी आनंद प्राप्त करण्यास मदत करतात.
शिबिराचे फायदेः
भीती, चिंता, राग, तणाव, कंटाळा व आसक्ती पासून मुक्ती प्रेम, आनंद, मौन, विश्वास, समाधान व समृद्धीचा अनुभव भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्तता व भविष्या बद्दलच्या चिंतांचे निरसन ध्याना बद्दल सखोल माहिती व तणावमुक्त जीवनाकडे वाटचाल, तेजज्ञान फाउंडेशनतर्फे १८ वर्षांवरील सर्व साधक, ध्यानप्रेमी व नागरिकांना या शिबिरात मोठया संख्येने सहभागी होण्याचे प्रा. डॉ. सुभाष पाटणकर यांचे सह आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.या शिबिराचा कोपरगावसह शिर्डी, राहता, येवला, श्रीरामपूर, संगमनेर, या परिसरातील साधक व ध्यानप्रेमी लाभ घेऊ शकतात
नोंदणीः ऑनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक चा वापर करा : https://www. tejgyanglobal.org/sis
शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणीची सुविधाही उपलब्ध.





