banner ads

कर्पे महाराज यांची वारकरी साहित्य परिषदेच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी निवड

kopargaonsamachar
0

 कर्पे महाराज यांची वारकरी साहित्य परिषदेच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी निवड

कोपरगाव समाचार :-
संत-महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्हयाची ओळख ही वारकरी साहित्याने जपली आहे. वारकरी नेहमी आपल्या शैलीने रसाळ वाणीतून समाजप्रबोधन करत सुसंस्कृत समाज घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्याला बळ मिळावे म्हणून त्यांची दखल घेऊन वारकरी साहित्य परिषद अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ह भ प आण्णांसाहेब शिंदे यांनी संवत्सर येथील ह. भ. प. . भिका नामदेव कर्पे महाराज यांची वारकरी साहित्य परिषद कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी निवड केली.

त्यांच्या या निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल तसेच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष .मुकुंद मामा काळे, सौ.छाया मुकुंदमामा काळे, कोपरगाव तालुका पुर्व मंडल कार्यकारणी सचिव .गणेश साबळे यांनी ह.भ.प..भिका नामदेव कर्पे महाराज यांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन .राजेंद्र परजणे व संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना ह भ प कर्पे महाराज म्हणाले की, मी समाज प्रबोधना बरोबरच वारकरी साहित्य परिषदेने माझ्यावर सोपविलेले जबाबदारी मी पूर्णत्वास नेण्याचा आटोकार प्रयत्न करील.
यावेळी ह.भ.प. लहानु गुंड, मुकुंद काळे, सौ.छाया मुकुंद काळे, गणेश साबळे व वाल्मीक पवार आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!