कोपरगाव शिवसेना कायदे विभाग विधानसभा अध्यक्षपदी ॲड खामकर
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड शिवाजीराव खामकर यांची कोपरगाव शिवसेना पक्षाच्या कायदे विभाग विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदे विभागात शिवसेना पक्षासाठी ॲड खामकर विशेष काम करत शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन केले. याच कामाची दखल घेत त्यांची वरील पदावर निवड करण्यात आली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर स्व आंनंद दिघे यांची शिकवणीचा सक्रिय प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे ॲड खामकर यांनी सांगितले.
शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सहीचे निवडीचे पत्र त्यांना मिळाले आहे.ॲड खामकर यांच्या निवडीचे कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.




