banner ads

नगर मनमाड महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा उपोषण-दिपक धट

kopargaonsamachar
0

 नगर मनमाड महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा उपोषण


कोपरगांव समाचार  /  लक्ष्मण वावरे 

            अहिल्यानगर जिल्हयाची शान असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला दृष्ट लागली असुन त्यावर दररोज होणा-या वाहन अपघातांची मालिका थांबायला तयार नाही, त्यात गोर-गरीब निष्पाप नागरिकांसह प्रवाशांचे बळी जात आहे तेंव्हा शासनांने हे निरपराध बळी थांबवावे व नगर मनमाड महामार्गाचे धिम्म्यागतीने सुरू असलेले काम तातडीने दर्जेदार करून प्रवाशाससह वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा याविरूध्द उपोषण करण्याचा इशारा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक धट पाटील यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
त्यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की, नगर मनमाड महामार्ग रस्त्यात खड्डा आहे की, खड्डयात रस्ता आहे हेच समजत नाही. नगर मनमाड महामार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाची धार्मिक स्थळे, मोठ्या प्रमाणांत आहे, त्याच्या दर्शनासाठी भारत देशासह विदेशातुन येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध शासकीय निमशासकीय कार्यालये कामासाठी अनेकांचा त्यावरून प्रवास सुरू असतो, रस्ता चांगला नसल्यांने त्यातुन दररोज अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावरून दैनंदिन प्रवास करतांना वाहनधारकासह पायी चालणा-या पादचा-यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. यात दररोज होणा-या अपघातांची मालिका थांबायला तयार नाही.

 संबंधीत विभागाचे अधिकारी वेळेत काम पुर्ण करत नाही. शासनांने देखील या नगर मनमाड महामार्गाच्या कामासाठी पुरेशा प्रमाणांत आर्थीक निधीची तरतुद करून याचे काम दर्जात्मक कसे होईल व यावरून प्रवास करणा-या वाहनधारकासह प्रवाशी पादचा-यांचा सुखकर प्रवास कसा होईल याकडे लक्ष द्यावे अन्यथा याविरूध्द मराठा क्रांती संघटनेच्यावतींने उपोषण छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष दिपक धट पाटील, उत्तमराव धट पाटील (राहता तालुका अध्यक्ष) शिवाजीराव चौधरी (अहिल्यानगर जिल्हा संघटक),सोमनाथ राशिनकर (सचिव कोपरगाव तालुका), बापू सुरळकर (जिल्हा उपाध्यक्ष), रवींद्र जगताप (येवला शहराध्यक्ष) कैलास पवार (नाशिक जिल्हाध्यक्ष), लताताई भिसे (नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष), प्रशांत कदम (नाशिक शहर उपाध्यक्ष), गणेश गडाख (सिन्नर तालुका सचिव), सोमनाथ घोलप (संघटक सिन्नर तालुका), प्रशांत कदम (नाशिक शहर उपाध्यक्ष) यांच्यासह अहिल्यानगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या रस्ते अपघातात निष्पाप बळी पडलेल्यांच्या वारसांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!