दवंगे वस्ती शाळेच्या मुलांची नूतन डेअरीला भेट
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवंगेवस्ती (मळेगाव थडी) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध नूतन डेअरीला भेट देऊन डेअरी विषयी माहिती घेतली परिसरातील दूध संकलन केंद्राला भेट दिल्याचा आनंद मुलांनी अनुभवला

दूध संकलन केंद्राची माहिती बाबासाहेब घायतडकर यांनी मुलांना दिली दूध कसे संकलित केले जाते दुधापासून कोणकोणते पदार्थ बनवितात दूध कुठे कुठे ट्रान्सपोर्ट होते तसेच विविध यंत्रसामग्रीची माहिती त्यांनी मुलांना दिली मुलांनीही सक्रिय सहभाग घेत किती लिटर दूध गोळा होते, ताक दही पनीर, तूप कसे तयार करतात असे प्रश्न विचारू माहिती घेतली एक वेगळाच अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला
यावेळी नूतन डेअरीचे संस्थापक शिवाजी घायतडकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना लस्सी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ मंडाळकर, उपशिक्षिका श्रीमती अस्मिता भांगरे, संदीप बाबासाहेब गाडे, बाबासाहेब धुळे आदी कर्मचारी व पालक उपस्थित होते