banner ads

ब्राम्हणगाव ग्रामपंचायततीचा डिजिटलकडे प्रवास

kopargaonsamachar
0

ब्राम्हणगाव ग्रामपंचायततीचा डिजिटलकडे प्रवास 

कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे 
ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना ग्रामपंचायतींच्या कामांची माहिती  ऑनलाइन उपलब्ध होईल. यासाठी ब्राम्हणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले ,उप सरपंच यमुनाबाई आसने व ग्रामविकास अधिकारी विजय पाटील  यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतने एक अनोखा उपक्रम राबवित  डिजिटल क्रांती कडे एक पाऊल टाकत स्वतःची ऑनलाइन वेबसाइट बनवली असून तालुक्यात ही ग्रामपंचायत सध्या तरी आपली ऑनलाइन वेबसाईट असणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे .
ग्रामपंचायत ने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहे ..गटविकास अधिकारी संदीप दळवी, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवने यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ब्राम्हणगाव ग्रामपंचायत ने मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानात भाग घेतला असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी दिलेले सर्व उपक्रम राबवले आहेत त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाइन वेबसाईटला ह्या योजनेत २ गुण होते ..ह्या साठी तसेच ग्रामपंचायत च्या विविध योजना गावात तसेच महाराष्ट्रभर पोहचवाव्या म्हणून हे काम केलेले आहे..ग्रामपंचायत ब्राम्हणगाव च्या माध्यमातून असेच काम सुरू राहील व जनतेच्या सेवेसाठी अशी अनेक विकासात्मक  कामे सुरू असून काही विकास कामे पावसाळा संपताच सुरू होणार असल्याचे  सरपंच अनुराग येवले यांनी सांगितले. ग्रामपंचायत डिजिटल वेबसाईट करण्यासाठी इंजिनिअर व वेब डेव्हलपर राहुल येवले ,नंदिनी करपे ,युवराज विखे यांनी मेहनत घेतली.

🌐 वेबसाईटवर काय-काय दिसेल?
ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवर खालील माहिती असेल:
1. गावाचा इतिहास आणि माहिती
2. ग्रामपंचायतीचे जमा-खर्चाचे हिशोब
3. विविध सरकारी योजना आणि त्यातून मिळणारे लाभ
4. ग्रामपंचायतीचे प्रकल्प आणि उपक्रम
5. नागरिकांना लागणाऱ्या फॉर्म्स आणि सेवा माहिती
6. गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिरं, परंपरा इत्यादी माहिती
7. पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, वीज यांसारख्या विकास कामांची स्थिती
8. तक्रार निवारणासाठी ऑनलाइन सुविधा
🧾 फायदा काय होणार?
✅ पारदर्शकता वाढेल – ग्रामपंचायतीत किती पैसा आला आणि कुठे खर्च झाला हे सर्वांना दिसेल.
✅ गावाचा इतिहास जपला जाईल – गावातील जुनी माहिती, परंपरा आणि संस्कृती इंटरनेटवर साठवली जाईल.
✅ लोकांचा सहभाग वाढेल – नागरिक थेट वेबसाईटवर माहिती पाहू शकतील, सुचना देऊ शकतील.
✅ भ्रष्टाचारावर नियंत्रण – सर्व व्यवहार खुलेपणाने जगासमोर येतील

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!