banner ads

रस्त्यांच्या कामांची गती वाढवा आ काळेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

kopargaonsamachar
0

 रस्त्यांच्या कामांची गती वाढवा आ काळेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे 
कोपरगाव मतदार संघात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असून हि कामे अतिशय धीम्या गतीने सुरु आहेत तर काही ठिकाणी कामे मंजूर असूनही हि कामे अद्याप सुरु झालेली नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी होवून नागरीकांना त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणात पडत असलेला परतीचा पाऊस व तालुक्यातील दोनही साखर कारखान्यांचे सुरु झालेले गळीत हंगाम या  पार्श्वभूमीवर अधिकची वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून रस्त्यांच्या कामांची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अधिकारी व ठेकेदारांकडून अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे सावळीविहीर कोपरगाव रस्त्याच्या दोन ठिकाणी रखडलेल्या कामामुळे वाहूतक कोंडी होवून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याप्रमाणेच प्रगतीपथावर असलेल्या मात्र आतिशय संथ गतीने सुरु असलेल्या राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याच्या कामामुळे नागरीकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे याची गांभीर्याने दखल घ्या.
            एक नोव्हेंबर पासून तालुक्यातील दोनही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होणार असल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्यामुळे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात अडचणी येवून नागरीकांच्या त्रासात देखील अधिक भर पडली आहे. राज्य मार्ग ०७ चे काम प्रगतीपथावर असून कित्येक ठिकाणी रस्ता खोदल्यामुळे त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल अशा उपाययोजना करा. या रस्त्यावर ज्या ठिकाणी सीडी वर्कची कामे करणे गरजेचे आहे त्याठिकाणी पाहणी करून सीडी वर्कची कामे सुरु करा.
पुणतांबा फाटा ते कोपरगाव रस्त्यावर ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे डक आहेत त्या ठिकाणी पडलेल्या खड्याची दुरुस्ती करून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा जेणेकरून हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जावून त्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. परतीचा पाऊस थांबला असून मतदार संघातील ज्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत परंतु अद्याप सुरु झाली नाहीत त्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी या बैठकीत अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.यावेळी राज्य मार्ग ०७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याच्या संबंधित ठेकेदाराने तातडीने कार्यवाही करून येत्या पंधरा दिवसात वाहतुकीला येणाऱ्या अडचणी दूर करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांना सांगितले.
या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता एस.आर.वर्पे, उपकार्यकारी अभियंता वर्षराज शिंदे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ए.एल.जमाले, अभियंता पी.पी.गायकवाड, अक्षय शिंदे, व्ही.व्ही.पालवे, आर.पी.गंभीरे, आर.ए.जाधव, व्ही.व्ही.माने तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी नागरीक उपस्थित होते.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!