तिसऱ्या पर्यायासाठी महा विकास आघाडीलाच पसंती -- अँड.संदिप वर्पे
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील जनतेला तिसरा पर्याय देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आमची महाविकास आघाडीलाच पसंती राहणार असुन महाविकास आघाडीचा सर्वानुमते एकच उमेदवार नगराध्यक्ष पदांची निवडणूक लढवेल आणि त्याला आपण मोठ्या मताने निवडून आणु असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते अँड संदिप वर्पे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी अँड संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी अँड संदीप वर्पे बोलत होते .यावेळी कोपरगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव ,तालुका उपाध्यक्ष सुरेश असणे, तालुका सेवा अध्यक्ष गोवर्धन सोनाळे ,युवक शहर अध्यक्ष स्वप्निल पवार ,पश्चिम तालुका अध्यक्ष सुनील वर्पे, सल्लागार अँड रमेश गव्हाणे , अँड दिलीप लासुरे संतोष वडणे सोशल मीडिया शहराध्यक्ष ऋतुराज काळे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष गौतम बनसोडे, उपाध्यक्ष शुभम शिंदे ,कार्याध्यक्ष युवक रिंकू मगर ,शहर उपाध्यक्ष मजीत पठाण ,उपाध्यक्ष दिनेश पवार ,तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात ओवेस पठाण ,आदीसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते .
याप्रसंगी अँड संदीप वर्पे बोलताना म्हणाले की कोपरगाव शहर आगामी नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांनी वैयक्तिक निर्णय घेत वेगवेगळे उमेदवार देण्याचे जाहीर केले असताना मी त्या दोन्ही पक्ष नेत्यांशी भेटून नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचा सर्वानुमते एकच उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढेल आणि त्याला आपण मोठ्या मतांनी निवडून आणू या संदर्भात चर्चा करणार आहे. असे असले तरी यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जर योग्य न्याय मिळाला तर निश्चितच महाविकास आघाडीच करायची, आम्ही बी राजकीय पक्ष आहोत शरद पवार पक्षाचा विचार घेऊन आम्ही वाटचाल करणार आहे हे करीत असताना ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवायचा प्रयत्न असतो, आले तर सोबत घेऊ, नाही आले तर स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे सुतोवाच देत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात राहणार असून पंचरंगी लढत होणार असल्याचे अँड संदीप वर्पे यांनी सांगितले.
उपस्थितांचे आभार अँड दिलीप लासुरे यांनी मानले.






