राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक बहुमताने विजयी होतील - आ.आशुतोष काळे
राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज सोमवार (दि.१७) रोजी शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदा दुध संघाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व धर्मिय प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक निर्णयअधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सौ.भारती सागरे यांच्याकडे सादर करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की,२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे कधी २३ तर कधी १६ दिवसांनी मिळणारे पाणी आज कोपरगावकरांना दर चार दिवसांनी मिळत आहे आणि यापुढील काळात ते दररोज किंवा दिवसाआड मिळेल याचा कोपरगावच्या जनतेला विश्वास आहे. मागील सहा वर्षाच्या कालखंडात आमदार निधीच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासात झालेला बदल कोपरगावची जनता अनुभवत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे विकासाचे व्हिजन आहे आणि जनता विकासासोबत असून ०२ तारखेला पार पडणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना जास्तीत जास्त मतदान करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे म्हणाले की, मी कोपरगावच्या नागरीकांचा लाडका काका आहे. कोपरगावाचा विकास हाच माझा उद्देश आहे.माझे समाजकारण काय आहे कोपरगावच्या जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे कुणाला माझी कुंडली काढायची असेल तर त्यांनी ती कुंडली खुशाल काढावी. पण मला विश्वास आहे विरोधक अशा कुंडलीच्या भानगडीत पडणार नाही आणि त्यांनी पडू पण नये. नाहीतर आमच्याकडे पण विरोधी उमेदवारांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या महाकुंडल्या आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे असा गर्भित इशारा देवून मी राष्ट्रवादी पक्षाचा जुना कार्यकर्ता असून मी पुन्हा माझ्या पक्षात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.