आंतर महाविद्यालयीन मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व रयत शिक्षण संस्थेचे एस. एस जी. एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन . ॲड भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर महाविद्यालयीन फुटबॉल (मुली) स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले
या स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य . ॲड संदीप वर्पे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र देवकाते हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ॲड. संदीप वर्पे व प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे महत्व अधोरेखित केले. अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या पात्रताधारक पंचांकडून पंच कार्य यशस्वीरित्या पार पाडले.
सदर स्पर्धेतून निवडलेला संघ हा मालेगाव येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. सदर संघात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. हर्षदा बोरसे, कु. अंजली कोल्हे, कु. तनु भारती व कु. अलिशा खंडीझोड यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, प्रा. सुनील कदम, . मयूर साठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे यांनी केले सदर स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




