केवळ सत्तेसाठी नाही तर आम्ही सेवेसाठी काम करतो, कोल्हे यांना विजयाचा विश्वास
भव्य शक्ती प्रदर्शनात पराग संधान व सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगावचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान आणि सर्व प्रभागाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मा. आ. स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आले.यावेळी महापुरुषांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ते तहसील मैदान अशी मुख्य रस्त्याने पदयात्रा काढली गेली.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोपरगाव शहरात झालेले खराब रस्ते,धूळ,आरोग्य,स्वच्छता ,पाणी या मूलभूत समस्या मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आ.काळे आणि प्रशासक यांच्या हातात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटण्या ऐवजी मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाल्याचे निदर्शनास येते. सर्वात आधी आम्ही उमेदवार जाहीर केले.विरोधाकांकडे शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची वाणवा होती त्यामुळे त्यांना दुर्दैवाने आयात उमेदवार घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या निवडणुकीत कोपरगावकरांनी धोकातंत्र करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करण्याचे निश्चित केले असून विजय आमचाच निश्चित होणार आहे व गुलाल आमचेच उमेदवार घेतील असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
लहानपणापासून मला कोपरगाव शहराच्या विविध भागांची माहिती आहे. संकटे आणि समस्यांमध्ये अनेकदा मी कार्यरत राहिलो आहे त्यामुळे जनसामान्यांना अडचणी ठरणारे प्रश्न मला प्रत्येक भागात मागील दहा वर्षापासून सर्व भागात सक्रिय असल्याने माहिती आहे.ते सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य असणार आहे. माझ्या समवेतचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पद हे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ कारण जनतेने दिलेली ही उमेदवारी आहे कुणाच्या इशाऱ्यावर मिळालेली नाही.आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी मैदानात उतरलो आहोत अशी प्रतिक्रिया पराग संधान यांनी दिली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी, आर पी आय, लोकसेवा आघाडीचे सर्व उमेदवार, ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.