banner ads

बचत गट चळवळीने महिला आत्मनिर्भर झाल्या - स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0

 बचत गट चळवळीने महिला आत्मनिर्भर झाल्या - स्नेहलता कोल्हे 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर क्रांती लोकसंचलित साधन केंद्र कोपरगाव यांच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मा. आ. स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.

 यावेळी मनोगत व्यक्त करताना महिला बचत गट चळवळीमुळे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाल्या असे सांगून महिलांना अर्थक्रांतीची जोड मिळाल्याने कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक परिवर्तनाचे देखील दार खुले झाल्याचे मत व्यक्त केले.आज एकविसाव्या शतकातील महिला कुठेही मागे नसून आपल्या बौद्धिक क्षमतेवर त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला सक्षमपनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या ठसा उमटवू शकतात हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मी देखील बचत गटाची एक सदस्य म्हणून माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात केली त्यातून राजकीय प्रवास घडला अशी आठवण सांगितली.महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक केले.संस्थेच्या विकासाची घोडदौड होते आहे मात्र या सोबतच महिलांनी केलेली अर्थक्रांती कायम महत्वाची मानली जाईल.बचत गटाच्या चळवळीने महिला आत्मनिर्भर होता आहे याचे कौतुक केले.

जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश कहाते, आर बी डी सी चे नवनाथ नाईक, आय सी आय सी आय बँकेचे प्रतिनिधी सय्यद, एचडीएफसी मॅनेजर किरण शिंदे, टेक्निकल वॉलमार्ट चे मॅनेजर कमल जी, केंद्राच्या माजी अध्यक्ष उषा निकम, विद्यमान अध्यक्ष सविता पगारे, कोपरगाव तालुक्याच्या व्यवस्थापक सविता परदेशी, सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!