banner ads

काळे महाविद्यालयाच्या .ईश्वरी निंबाळकरची चमकदार कामगिरी

kopargaonsamachar
0

 काळे महाविद्यालयाच्या .ईश्वरी निंबाळकरची चमकदार कामगिरी

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे  ) केंद्र      सरकार आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.ईश्वरी विठ्ठल निंबाळकर हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली.

हरियाणा राज्यातील हिसार येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठ येथे (दि.८) ते (दि.१४) ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय एकात्मता शिबिर पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कु.ईश्वरी निंबाळकरसह केवळ तीन विद्यार्थिनींची या शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. या कालावधीत श्री सत्य साई सेवा संस्था, हिसार यांच्या वतीने आयोजित मुलींच्या गटातील ३ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत ईश्वरीने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळविला. 

या यशासाठी तिला प्रा. विशाल पोटे, डॉ.भाऊसाहेब कांबळे, प्रा.भिमराव रोकडे,प्रा. विनोद मैंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु.ईश्वरी निंबाळकर हिने मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैताली काळे, संस्था निरीक्षक प्रा.नारायण बारे, प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!