banner ads

संजीवनीच्या संशोधकांची जगात नोंद

kopargaonsamachar
0

 अमेरिका युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्च   संशोधकांच्या   यादीत संजीवनीच्या डॉ. ए.एस. सय्यद व डॉ. पी. विल्यम यांचा समावेश


 संजीवनीच्या संशोधकांची  जगात नोंद
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या अशा  दोन संशोधक प्राध्यापकांनी अमेरिकेत आपल्या संशोधनाचा झेंडा फडकवीला.  तेथील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जगातील सर्वोच्च संशोधन असणा-या पहिल्या दोन टक्के संशोधकांची यादि प्रसिध्द केली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड  डेव्हलपमेंट विभागाचे डायरेक्टर  डॉ. पी. विल्यम यांचा समावेश  आहे.

 या निमीत्ताने जगभरातील सहा लाख संशोधकात या दोघांची उच्चस्तरीय संशोधक म्हणून गणना झाली. संजीवनी शैक्षणीक संकुल आणि युनिर्व्हसिटीच्या दृष्टीने हि भुषणावह बाब आहे. अशी प्रतिक्रीया संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी दिली. संजीवनीच अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे यांनी या डिओघांचेही अभिनंदन केले. युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट  अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, जगभरातील सहा लाख संशोधकांत भारतातील केवळ ६ हजार २३१ संशोधकांचा समावेश आहे त्यात संजीवनीच्या दोघा संशोधक प्राध्यापकांचा समावेश आहे.

     डॉ. सय्यद यांनी आंतरराष्ट्रीय  जर्नल्स मध्ये १७५  हुन अधिक संशोधनात्मक प्रबंध  सादर केले.  विविध संशोधनांसाठी त्यांना २० पेटंट मिळाले. त्यांची दहा पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. डॉ. विल्यम यांनी २२७ हून अधिक आंतराष्ट्रीय  जर्नल्समध्ये संशोधनात्मक प्रबंध प्रसिध्द केले. विविध  संशोधनाची त्यांनी एकुण १२ पेटंट मिळवीली आहेत.त्यांची २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत
.

 {संजीवनी इंनिअरिंग काॅलेज मध्ये संशोधनपूरक वातावरण आहे. सुसज्ज प्रयोग शाळा आणि ग्रंथालय उपलब्ध आहे. त्यामुळे संशोधन करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. व्यवस्थापनाचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळते. माझ्या संशोधनाची जागतिक पातळीवर घेतलेली नोंद आम्हा सर्व संशोधकांचा उत्साह वाढवीणारी आहे.-डॉ. ए. एस. सय्यद ( सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख,संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज }
--------------------------------
,{स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने निवडलेल्या जगभरातील सहा लाख संशोधकांमध्ये सर्व क्षेत्रातील संशोधकांचा समावेश आहे. त्यात संशोधन कार्याचा मानवतेसाठी उपयोग, संशोधनास संबंधित संस्थाकडून मिळालेली मान्यता आणि नाविन्य हे निकष लावले जातात. माझ्या संशोधनाची जागतिक पातळीवर  दखल घेण्यात आली. त्याचे श्रेय संजीवनी युनिर्व्हसिटीने उपलब्ध करून दिलेल्या संशोधनपुरक वातावरणाला देखील आहे.
 -डॉ. पी. विल्यम (संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड  डेव्हलपमेंट विभागाचे डायरेक्टर }

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!